Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर 40 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान आजच अनलॉक 5.0 सुरू झाला असून केंद्र आणि राज्य सरकारनं कंन्टेंमेंट झोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1336 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत तर पुणे शहरातील तब्बल 40 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 26 जणांचा पुणे शहरात आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं तब्बल 3486 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1431 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 45 हजार 291 वर जाऊन पोहचली आहे.
त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1 लाख 25 हजार 260 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोना 16545 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 932 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 516 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.