Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1055 नवे पॉझिटिव्ह तर 38 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1055 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून पुणे शहरातील तब्बल 38 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 16 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3609 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1286 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 48 हजार 406 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 28 हजार 925 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 15 हजार 872 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 895 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 505 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.