Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 300 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात मंगळवारी (दि.16) 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 272 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 620 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 142 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 802 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 719 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 95 हजार 496 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 88 हजार 975 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 93 हजार 231 रुग्णांपैकी 3 लाख 79 हजार 453 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 726 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.50 टक्के आहे.