Coronavirus : पुण्यातील ‘कोरोना’ची परिस्थिती कायमच, आज देखील 800 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशात आणि राज्यात देखील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे पण नवे पॉझिटिव्ह रूग्ण देखील मोठया संख्येने समोर येत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 852 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून तब्बल 12 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळं पुणे शहरात आतापर्यंत एकुण 715 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पुणे शहरात आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या 21520 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 13109 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सध्या पुणे शहरात एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 7696 एवढी आहे. आज आढळून आलेल्या 852 रूग्णांमध्ये ससूनमधील 17, नायडू रूग्णालयातील 607 आणि इतर खासगी रूग्णालयातील 228 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल 420 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 7696 रूग्णांपैकी 410 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यौकी 70 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 715 जणांचा बळी गेला आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण

दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मोहोळ यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांचे कोरोनाचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणेकर जनतेने प्रशासनाला सहकार्य करून विनाकारण घराबाहेर पडू नये.