Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेसचे गटनेते आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरातील अ‍ॅमेनिटी स्पेस (Pune Corporation Amenity Space) खाजगी वापरासाठी ३० ते ९० वर्ष इतक्या दीर्घ मुदतीच्या काळासाठी भाडयाने देण्याचा म्हणजेच विक्री करण्याचा भाजपने रचलेला डाव हा पुणेकरांच्या हिताविरूध्द आहे. पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीचे गोंडस नाव देऊन हा विषय मान्यतेसाठी सादर केला आहे. अ‍ॅमेनिटी स्पेस (Pune Corporation Amenity Space) या नागरिकांसाठी असून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होता कामा नये. नागरिकासाठी मोफत वापरास ठेवणे अपेक्षित आहे.

अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागांचा वापर करावयाचा झाल्यास पुणे मनपा व विविध संस्थेमार्फत संयुक्त
प्रकल्प देखील करता येईल व संयुक्त प्रकल्प करताना ५० टक्के वापर मोफत व ५० टक्के
वापर व्यावसायिक केले तर सर्वसामान्य नागरिकांना (उदा.शाळा, हॉस्पिटल, क्रीडासंकुल) याचा लाभ मिळेल.
महानगरपालिकेचे अनेक संयुक्त प्रकल्प असून त्या धोरणाप्रमाणे देखील कार्यवाही होऊ शकते.
सदर ऍमिनिटी स्पेस वरील एफ.एस.आय वापरला असून त्यापोटी सदर अ‍ॅमिनिटी स्पेस ताब्यात आल्याने हि जागा नॉन बिल्टअप झाल्याने बांधकाम करता येईल हा कायदेशीर प्रश्न आहेच.
काही संस्था याविषयी न्यायालयात गेले आहेत याचाही विचार होणे आवश्यक आहे.
सदर अ‍ॅमिनिटी स्पेसवर झाडे लावल्यास हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार असून ऑक्सिजनचे महत्व कोरोना काळात अधोरेखित झालेले आहे.

 

तसेच रस्त्यावरील अमर्याद पार्किंग वाढत असून रस्ते हे पार्किंगसाठी नाहीत असे उच्च न्यायालयाने
देखील फटकारले असून नागरिकांच्या पार्किंगच्या सोयीसाठी सदर ऍामिनिटी स्पेसवर पार्किंग देखील
करता येईल व यामधूनही मनपास उत्पन्न मिळेल.
यामुळे या अ‍ॅमिनिटी स्पेस अनेक वर्षांपासून मनपाच्या ताब्यात आहेत त्या कोणाच्याही घशात घालून नका अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (PMC congress group leader aba bagul) यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Corporation Amenity Space | Punekars will never tolerate intrigue to put amenity space builders in their throats – Congress group leader Aba Bagul

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन फरार झालेली टोळी गजाआड