Pune Corporation | सेवा हमी कायद्यानुसार महापालिका येत्या डिसेंबरपासून आणखी 30 सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | महापालिका (Pune Corporation) आता सेवा हमी कायद्याची (public service guarantee act) अंमलबजावणी अधिक सक्षमपणे करण्यासाठी आणखी तीस सेवा या ऑनलाईन उपलब्ध करुन देणार आहे. डिसेंबर महीन्यापासून नागरीकांना मिळतील अशी माहीती अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (pmc addl commissioner ravindra binwade) यांनी दिली.

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणी विभागाचे प्रमुख आणि माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोमवारी महापालिकेमार्फत (Pune Corporation) देण्यात येणार्‍या ऑनलाईन सेवांच्या संदर्भातील आढावा घेतला. यावेळी आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar), अतिरीक्त आयुक्त बिनवडे आदी उपस्थित होते. औंध (Aundh)आणि घोले रोड (Ghole Road) क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी भेट देऊन माहीती घेतली. प्रशासकीय कामाकाजाविषयीची नागरीकांच्या मनातील प्रतिमा पुसण्यासाठी सेवा हमी कायदा लागू केला गेला.

नागरीकांना या कायद्यानुसार महापालिकेची सेवा हवी असल्यास त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर किती दिवसांत त्याची परवानगी, दाखला आदी दिली पाहीजे याचे नियम ठरविण्यात आले आहे. या प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी ऑनलाईन कामकाजालाही प्राधान्य देण्यात आले. महापालिकेकडून सध्या ८३ प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यापैकी १८ सेवा या ऑनलाईन उपलब्ध आहे. यामध्ये महापालिकेच्या मिळकत कराच्या विभागातील काही सेवांचा समावेश आहे. इतर सेवांचा ऑनलाईन पद्धतीत समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आरोग्य विभागाच्या तीस, पाणी पुरवठा विभागाच्या पंधरा, बांधकाम विभागाच्या पाच अशा इतर विभागांच्या सेवांचा यात समावेश आाहे. डिसेंबर महीन्यापर्यंत महापालिकेच्या आणखी तीस सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्या जातील. यामध्ये नागरीकांना प्रतिसाद म्हणून एसएमएसही पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. नागरीकांनी दाखल केलेल्या अर्जाची, प्रकरणाची काय स्थिती आहे. हे त्या एसएमएसद्वारे नागरीकांना समजण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन कामकाज पद्धतीचे महत्व सर्वांना समजले आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रयत्न करणार आहे असे बिनवडे यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे विविध सेवांसाठी दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे :

२०१८-१९ : ऑनलाईन : ६७ हजार, ऑफलाईन : १ लाख ४२ हजार

२०१९-२० : ऑनलाईन: ५२ हजार ५९२, ऑफलाईन : १ लाख २८ हजार१३३

२०२०-२१ : ऑनलाईन : ५ हजार ६८३ , ऑफलाईन : ५३ हजार ७८४.

आगस्ट अखेर : ऑनलाईन : १० हजार ६१३ आणि ऑफलाईन : ९५ हजार ५८९

पहील्या अपिलात गेलेली प्रकरणे ४०१ , दुसर्‍या अपिलात गेलेली प्रकरणे ३६४ आणि प्रलंबित प्रकरणे ३.

Web Title :-  

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | दत्तवाडी परिसरातील सोसायट्यांतील पाणी पुरवठा विस्कळीत ! महापालिकेवर मोर्चा काढणार – अभिजित बारवकर

Taljai Development Project | तळजाई विकास प्रकल्पाला केला जाणारा विरोध हा दुर्दैवी ! प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांचे मत

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या