Taljai Development Project | तळजाई विकास प्रकल्पाला केला जाणारा विरोध हा दुर्दैवी ! प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांचे मत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Corporation) प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्पाला (Taljai Development Project) पूर्ण माहिती न घेताच केला जाणारा विरोध हा दुर्दैवी असून, त्यांच्या या भूमिकेमुळे या नियोजित प्रकल्पाचा प्रोजेक्टर आर्किटेक्ट म्हणून मला दु:ख झाल्याचे प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर (Project Architect Anand Uplekar) यांनी म्हटले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तळजाई विकास प्रकल्पाची (Taljai Development Project) योग्य माहिती घ्यावी, त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन निश्चित होईल. कारण सहकारनगर परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी घेतलेले आक्षेप (Objection) हे तळजाई विकास प्रकल्पाला लागू नसून, त्याला लागूनच असलेल्या राज्य सरकारच्या (state government) पाचगाव पर्वती ( Pachgaon Parvati) क्षेत्राशी निगडित आहेत.

निसर्गाला जपण्यासाठी केवळ मातीचाच उपयोग
पाचगाव पर्वती हा राज्य सरकारचा सुमारे सहाशे एकरचा जंगल भाग भिन्न असून, नजीकचा सुमारे 107 एकर परिसर पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असून, तेथेच तळजाई विकास प्रकल्प उभारण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील 107 एकर जमिनीपैकी यापूर्वी सुमारे पाच एकर जागेवर क्रिकेटपटू सदु शिंदे क्रिकेट स्टेडियम (Sadu Shinde Cricket Stadium) उभारण्यात आले असून, यामध्ये कोठेही सिमेंट काँक्रीटचा वापर करून पक्के बांधकाम केलेले नाही. तर पूर्णत: नैसर्गिक मातीचाच यामध्ये वापर करण्यात आला आहे. या प्रस्तावित 107 एकरच्या प्रकल्पात सध्या नाममात्र मोठे वृक्ष असून, त्यांचीदेखील देखभाल या नियोजित प्रकल्पात केली जाणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारची उद्याने व अन्य सुविधांमध्येदेखील कोठेही सिमेंट काँक्रीटचे (cement concrete) पक्के बांधकाम केले जाणार नसून, निसर्गाला जपण्यासाठी केवळ मातीचाच उपयोग केला जाणार आहे. तसेच या 107 एकर प्रस्तावित प्रकल्पात सुमारे 10 हजारांहून अधिक देशी वृक्ष लावले जाणार असून, त्यामुळे पक्षी, फुलपाखरे आदी मोठ्या संख्येने येथे येतील ही खात्री आहे.

 

ते काम तळजाई विकास प्रकल्पाअंतर्गत येत नाही

तळजाई विकास प्रकल्पाला (Taljai Development Project) विरोध करणार्‍यांनी येथे लक्षात घ्यावे की, या परिसरात जेसीबीचे काम चालू असून, अनेक वृक्ष तोडले जात आहेत असे जे सांगितले जात आहे ते तळजाई विकास प्रकल्पाअंतर्गत येत नाही. पुणे महानगरपालिकेच्या तळजाई टेकडीवरील 107 एकरच्या विकास प्रकल्पाला अद्यापही स्थायी समिती (Standing Committee) व सर्वसाधारण सभेने (PMC GB) मान्यता दिलेली नसताना पुणे महानगरपालिका येथे प्रस्तावित विकास प्रकल्प सुरू कसा करेल, हा प्रश्न या पर्यावरणप्रेमींनी जरूर विचारात घ्यावा.

 

फरक आवर्जून लक्षात घेतला पाहिजे
राज्य सरकारचे (Maharashtra Government) पाचगाव पर्वती क्षेत्र सुमारे 600 एकर हे नजीकच असून, तेथे जेसीबी अथवा वृक्षतोड याचा तळजाई विकास प्रकल्पाशी संबंध नाही तसेच पुणे महानगरपालिकेचाही काहीही संबंध नाही. काही पर्यावरणप्रेमींनी जेसीबीचा वापर व वृक्षतोड या पार्श्वभूमीवर येथील मोर नष्ट होतील असा सूर आळवला आहे. मोर (Peacock) नष्ट होत असतील तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, मोर हे राज्य सरकारच्या वन खात्याच्या सुमारे 600 एकर क्षेत्रात आहेत, तळजाई विकास प्रकल्प क्षेत्रात नाहीत. हा फरक येथे आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.

काही लोक दिशाभूल करीत आहेत
मात्र, काही हितसंबंधी लोक तळजाई विकास प्रकल्प आणि पुणे महानगरपालिकेची 107 एकर जागा
आणि राज्य सरकारची पाचगाव पर्वती म्हणून नोंदवली गेलेली सुमारे 600 एकर वन खात्याची जमीन (Forest Department land) एकच आहे
असे भासवून दिशाभूल करीत आहेत याची नोंद पर्यावरणवाद्यांनी प्रामुख्याने घेतली पाहिजे.
प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्प हा पूर्णत: निसर्गाशी बांधील राहून नागरिकांच्या सामाजिक पर्यावरणवादी भूमिकेला साजेसाच असणार आहे.

वन विभागाचे पाचगाव पर्वती क्षेत्र भिन्न आहे
यामध्ये पुणे महानगरपालिका व राज्य सरकार यांच्या भिन्न क्षेत्रांची गल्लत केली गेल्यामुळे जेसीबीची कारवाई अथवा वृक्षतोड ही तळजाई विकास प्रकल्पापोटीच केली जात आहे
असे भासवले गेल्यामुळे त्यास विरोध केला जात आहे.
मात्र, प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी पुणे महानगरपालिकेने स्थायी समितीला सादर केलेला सूक्ष्म विकास आराखडा (DPR) स्वत: अभ्यासावा…

Web Title :- Taljai Development Project | Opposition to Taljai development project is unfortunate! Opinion of Project Architect Anand Uplekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या

Harmful Effects of Nail Polish | जीवघेणे ठरू शकते नेलपेंट लावणे, जाणून घ्या यामुळे होणारे गंभीर नुकसान

Royal Enfield च्या पसंतीच्या बाईकला आता तुम्ही देऊ शकता मनासारखा ‘लूक’, घरबसल्या अशाप्रकारे करू शकता रंग-रूपाची निवड