Pune Corporation | मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प ! संगम पूल ते येरवडा अंदाज पत्रक बनविण्यास स्थायी समितीची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | मुळा-मुठा नदीकाठ विकास (mula mutha riverfront development) योजनेअंतर्गत संगम पूल ते येरवडा (sangam bridge to yerwada) पर्यंतच्या अंदाजे चार किलोमीटर अंतरासाठी अंदाज पत्रक (एस्टीमेट) तयार करण्यास Pune Corporation स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, ‘गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीच्या सुमारे44.4 किलोमीटर लांबीच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्याची पुणे महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मुळा-मुठा नद्या वाहतात. नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्याला राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.’

 

रासने पुढे म्हणाले, ‘या प्रकल्पासाठी नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, डिझाईन नकाशे तयार करणे, भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चित करणे, नदीच्या दोन्ही बाजूंच्या मिळकतींची मोजणी, सविस्तर प्रकल्प अहवाल आदी काम पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी 768 हेक्टर क्षेत्र लागणार आहे. नदीच्या वहनासाठी 526 हेक्टर, नदीच्या मजबुतीकरणासाठी 180 हेक्टर आणि विविध सुविधा पुरविण्यासाठी बासस्ट हेक्टर क्षेत्र लागणार आहे.’

 

या प्रकल्पामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता वाढणार आहे. पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविता येणार आहे. नदीकाठचे सुशोभीकरण होणार आहे, संपूर्ण नदीकाठ परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. नदीकाठची वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी उद्याने, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्प राबविण्यासाठी (Pune Corporation) दोन हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती ही रासने यांनी दिली.

 

‘मुळा-मुठा नदीकाठ साबरमतीसारखाच व्हावा, या पुणेकरांनी पाहिलेल्या स्वप्नाला साकारण्याची सुरुवात लवकरच होत आहे.
या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तर आजवरच्या टप्प्यात विविध पातळ्यांवर केलेल्या पाठपुराव्याला आलेले हे यश समाधानकारक आहे.
पुणेकरांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे पुढचे टप्पेही वेगाने पूर्ण करण्याचा या एसपीव्हीचा अध्यक्ष म्हणून प्रयत्न असणार आहे.

मुरलीधर मोहोळ (महापौर, पुणे)
Muralidhar Mohol (Mayor, Pune)

 

Web Title :-  Pune Corporation | Mula-Mutha river beautification project! Approval of Standing Committee for making estimate sheet from Sangam Bridge to Yerawada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 169 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Bitcoin | बिटकॉइनने एक आठवड्यात घेतली 16% आघाडी ! 57000 डॉलरच्या पुढे, इतर डिजिटल टोकन आले खाली

Pune Crime | बंदूकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लुटली; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना