Pune Crime | बंदूकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लुटली; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील 40 वर्षीय शेतकर्‍यास शेतातील औषधे आणण्यासाठी जात असताना बंदुकीचा (Gun) धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (Pune Crime) हिंगणगाव येथे सोमवारी (दि.11) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन, रोख रक्कम आणि दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात (Indapur Police Station) अ‍ॅट्रॉसिटीचा (atrocity act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

संजय शंकर सोनवणे Sanjay Shankar Sonawane (वय 40 रा.कांदलगाव,ता. इंदापूर, जि. पूणे) यांनी फिर्याद दिली असून धनु खराडे व सुधीर खराडे अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी हे कांदलगाव येथुन औषधे आणण्यासाठी दुचाकी (एमएच. 42, 3364) मोटार सायकलवरून भिमानगर (ता.माढा) येथे जात होते.
हिंगणगाव येथे आरोपींनी फिर्यादींची मोटार सायकल रस्त्यात जबरदस्तीने अडवली.
तु आमच्याकडे सारखाच का बघतो असे म्हणत फिर्यादींला जातिवाचक शिविगाळ करत मारहाण केली.
फिर्यादीचे दोन्ही हात पाठीमागे धरून फिर्यादीचे छातीला बंदूक लावली.
खीशातील सात हजार रूपये रोख व गळ्यातील दोन तोळ्याची चेन (Gold chain) काढून घेतली.

 

फिर्यादींने आरोपींना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी धणु खराडे (Dhanu Kharade) याने ‘मी अगोदरच एक खुन (Murder) करून जिरवला असुन त्यात मी निर्दोष सुटलो आहे.
आता मी बंदुकीने तुझा खुन करीन’ असे म्हणत मारहाण केली.
यावेळी फीर्यादींनी त्यांचे तावडीतुन सुटका करून घेतली व पुतण्याला फोन करून बोलावुन घेतल्याचे फीर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायदा (अ‍ॅट्रासिटी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन भरदिवसा घडलेल्या घटनेने हिंगणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी (Baramati Sub-Divisional Police Officer) करत असल्याची माहिती इंदापूर पोलीसांनी दिली.

 

Web Title : Pune Crime | Robbed of cash, including gold jewelry, at gunpoint; Sensational incident in indapur of Pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 96 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

IPP Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, 2.6 लाख रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या सविस्तर

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी