Pune Corporation | ‘स्मार्ट पुण्यात’ 5 वर्षात फक्त 520 मीटरचा रस्ता विकसित ! अस्तित्वातील रस्त्यांच्या पुर्ननिर्माणावरच सत्ताधारी भाजपचा भर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | मागील पाच वर्षात ‘स्मार्ट’ सिटीच्या नावाने डंका पिटला असला तरी स्मार्ट सिटीमध्ये सर्वाधीक मागणी झालेल्या ‘रस्त्यांच्या’ कामाकडे दुर्लक्षच झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोथरूड (Kothrud) येथील जेमतेम अर्धा कि.मी. (५२० मीटर) लांबीचा एक रस्ता वगळता नवीन एकही रस्त्याचे काम झालेले नाही. उलट मर्जीतील ‘ठेकेदारांना’ पोसण्यासाठी ठराविक रस्त्यांवरील पदपथांची सातत्याने कामे करण्यात आली असून अस्तित्वातील रस्त्यांची खोदाई करून चाळण करण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. (Pune Corporation)

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

महापालिकेमध्ये चार वर्षांपुर्वी ११ गावांचा तर मागीलवर्षी २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेची हद्द ५०० चौ.कि.मी. च्या पुढे गेली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी जवळपास प्रत्येकच रस्त्यावर वाहतूक कुर्मगतीने सुरू असते. त्याचवेळी चोवीस तास योजनेअंतर्गत सर्वच रस्त्यांवर खोदाई करण्याचे काम सुरू असल्याने अस्तित्वातील रस्तेही खड्डयात गेले आहेत. यावर उपाय म्हणून मध्यवर्ती भागामध्ये १० रुपयांत मिनीबसेसच्या माध्यमातून वर्तुळाकार मार्ग सुरू केला आहे. यासाठी उपनगरांतून येणार्‍या प्रवाशांचा बसप्रवास खंडीत करण्यात आला आहे. (Pune Corporation)

 

विशेष असे की मागील काही वर्षांत पथ विभागासाठी अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी ५०० कोटी रुपयांहून अधिक तरतुद करण्यात आली असताना किमान समाविष्ट ११ गावांतील नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्याचे नियोजन प्रशासन आणि सत्ताधारी देखिल करू शकलेले नाहीत. ठराविक चांगल्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, दरवर्षी त्याच त्या पदपथांचे ‘स्मार्ट सिटी’ च्या संकल्पनेप्रमाणे नूतनीकरण करण्यावरच अधिक भर देण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गतही बाणेर, बालेवाडी, औंध भागामधील अस्तित्वातील रस्ते, पदपथ आणि सायकल ट्रॅकची कामे करण्यात आली आहेत. यावरही ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्ता, गोखले (फर्ग्युसन) रस्ता, गणेश खिंड रस्ता, पाणाष-सूस रस्ता, स्वारगेट-कात्रज रस्ता, बिबवेवाडी रस्ता आदींचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणात सायकल ट्रॅक, ज्येष्ठांसाठी पदपथ, झाडे, हिरवळ आदींचा समावेश आहे.

शहरात सध्या १ हजार ४०० कि.मी.चे रस्ते आहेत. मात्र शहराचा भौगाीलक विस्तार पाहाता, हे रस्ते तुलनेने कमी आहेत. रस्त्यांच्या विकासासोबतच पार्किंग, मंड्यांचे विकसनाकडेही दुर्लक्ष झालेले आहेत. पथारी व्यावसायीकांच्या पुर्नवसनालाही गती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आहे ते रस्ते पार्किंग आणि बेकायदा व्यवसायांमुळे अंकुचित झाले आहेत.

 

फक्त कोथरूडलाच नवा रस्ता :
मागील पाच वर्षांत शहरात केवळ ५२० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा एकच नवीन रस्ता विकसित केल्याची लेखी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. हा रस्ता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राहत असलेल्या कोथरूड येथील महात्मा सोसायटी ते मुंबई-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वंडर फ्युचरा (डुक्कर खिंड) या दरम्यान करण्यात आला आहे.

 

पाच वर्षांमध्ये पथ विभागासाठी सुमारे ३ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यापैकी जेमतेम बाराशे कोटी रुपये खर्च झाले आहेत.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच कामांमध्ये व्यत्यय आला ही बाब खरी असली तरी पथ विभागाने
या कालावधीतही रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व पदपथांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली होती.
विशेष असे की दिर्घकाळ रखडलेल्या खराडी- शिवणे रस्त्यावरील संगमवाडी येथील चांगला रस्ता खोदून त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
सत्ताधार्‍यांशी निगडीत बड्या ठेकेदाराला पोसण्यासाठी २० कोटी रुपयांची उधळपट्टी याठिकाणी करण्यात आली आहे.

भूसंपादन व अन्य तांत्रिक कारणांमुळे वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते

शिवणे ते खराडी.

कात्रज ते खडी मशीन चौक (कोंढवा).

वडगाव बु. ते पु. ल. देशपांडे उद्यान कालव्या लगतचा रस्ता.

मयूर कॉलनी १८ मीटर डीपी रस्ता .

धानोरी जकात नाका ते डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्ता.

 

 

Web Title :- Pune Corporation | Only 520 meters road developed in 5 years in ‘Smart Pune’! The ruling BJP insists on rebuilding the existing roads

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

 

Hemant Rasne | सुवर्णयुग सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

 

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती