Pune Corporation | वारजे येथे बांधा- वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर 300 बेडस् चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी (Multispeciality Hospital) आरक्षित असलेल्या वारजे (Warje) येथील स.नं. ७९/ब आरक्षित जागेवर बांधा- वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर भव्य हॉस्पीटल उभारण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मिळावी यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Pune Corporation)

 

वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठी १० हजार ९१० चौ. मी. जागा आरक्षित आहे. या जागेवर महापालिकेच्यावतीने तळ मजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले असून सध्या तेथे ओपीडी चालविण्यात येत आहे. महापालिकेकडे (Pune Corporation) मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणे ते चालविणे यासाठी पैसे व मनुष्यबळही नाही. त्यामुळे या जागेवर बांधा- वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारावे यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) हे प्रयत्नशील आहेत.

या जागेवर ३०० बेडस्चे हॉस्पीटल तयार होउ शकते. यापैकी काही बेडस् सी. जी. एच. एस. दराने मोफत व काही बेडस् खाजगी दरामध्ये रुग्णसेवा देण्याची तयारी असणार्‍यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. या जागेवर हॉस्पीटल उभारणे, आवश्यक ते कुशल व अकुशल मनुष्यबळ, यंत्र सामुग्री पुरविणे ही सर्व जबाबदारी संबधित निविदाधारक संस्थेची असेल. या संपुर्ण कामासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी निविदाधारकाला कर्ज काढावे लागल्यास कर्जासाठी महापालिका हमी घेणार आहे.

 

निविदाधारकाने ३० वर्षे रुग्णालय चालवावे आणि नंतर ते संपुर्ण यंत्र सामुग्रीसह महापालिकेला हस्तांतरीत करायचे आहे.
या कामासाठी निविदा काढणे, राज्य शासनाची परवानगी घेणे यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
दरम्यान या जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीसाठी २०१९ मध्ये निविदा काढण्यात आली होती, तिला प्रतिसाद मिळाला नव्हता.

 

Web Title :- Pune Corporation | Proposal to build a 300 bed multispeciality hospital on the principle of build use transfer at Warje before the PMC Standing Committee

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा