Pune Corporation | पाणी पुरवठा विभागातील 38 कोटी रुपयांच्या निविदांचा ‘घोळ’ ! महापौरांच्या आदेशानंतर महिन्याभराने संबधित अधिकार्‍याची ‘बदली’; चौकशीही धिम्या गतिने

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corporation | ठराविक ठेकेदाराला कंत्राट मिळावे यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या (PMC water supply department) सुमारे 38 कोटी रुपयांच्या तीन निविदांमध्ये घोळ घालणार्‍या ‘एका’ अधिकार्‍याची तब्बल महिन्याभराने अखेर पाणी पुरवठा विभागातून बदली करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Corporation mayor murlidhar mohol) यांनी संबधित अधिकार्‍यांचा तत्काळ कारभार काढून चौकशी करावी व अहवाल सर्वसाधारण सभेला (General Body Meeting) सादर करावे असे आदेश दिले होते.

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने खडकवासला रॉ वॉटर प्रकल्प, तसेच वारजे व वडगाव जलकेंद्रातील कामांसाठी तीन निविदा काढण्यात आल्या आहेत. ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून या निविदा काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मागील महिन्यांतील सर्वसाधारण सभेत याचे तीव्र पडसाद उमटले होते. सत्ताधार्‍यांनीही अधिकारी महापालिकेची बदनामी करत असून आम्हाला रोषाला सामोरे जावे लागते, संबधित अधिकार्‍यांची चौकशी करून तातडीने कारवाई करा अशी मागणी केली होती. यावर आदेश देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संबधित अधिकार्‍याचा तातडीने पदभार काढून घेउन चौकशी करावी. तसेच चौकशी अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करावा असे आदेश दिला होता.

 

महापौरांच्या आदेशानंतर तब्बल महिनाभराने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Additional Commissioner Dr. Kunal Khemnar) यांनी आज संबधित अधिकार्‍याची अन्य खात्यामध्ये बदली करण्याचे आदेश काढले आहेत. विशेष असे की निविदा प्रकरणांची चौकशी अद्याप झालेली नाही. त्यामुळे अहवालही तयार करण्यात आलेली नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

 

Web Title : Pune Corporation | Water supply department’s Rs 38 crore tenders ‘mess’! ‘Transfer’ of the concerned officer within a month after the order of the mayor; The inquiries are also slow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुणे महापालिकेचा ‘चमको’ कारभार ! शहरातील रस्त्यांवरील ‘खड्डे’ बुजविण्याकडे दुर्लक्ष; मात्र, एकाच रात्रीत मनपा भवनमधील रस्त्याचे डांबरीकरण

Mumbai High Court | उच्च न्यायालयाचा राज्यपालांना ‘झटका; विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निर्णयाची करून दिली जाणीव

Pune Crime | पुण्याच्या विमानतळाजवळील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला लुटले; परिसरात खळबळ