Pune Court | खून प्रकरणातील 3 सख्या भावांची निर्दोष मुक्तता, व्याजाच्या पैशातून झाला होता खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Court | पैशाच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादावादीतून 4 सख्या भावांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना 1 ऑक्टोबर 2017 मध्ये पुण्यातील (Pune Crime) येरवडा (Yerawada) परिसरातील मज्जीद गल्ली समोरील सना केटरींग समोरील सार्वजनिक रोडवर रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती. याप्रकरणातील 3 भावांची अतिरिक्त सत्र न्ययाधिश सुनिल एस. वेदपाठक (Additional Sessions Judge Sunil S. Vedpathak) यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता (Pune Court) केली असल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सिद्धांत माळेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली.

अजय उर्फ बाळ्या मोतीराम गायकवाड, राजेश मोतीराम गायकवाड, विजय मोतीराम गायकवाड अशी निर्दोश मुक्तता केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी मयत अमिर खान याचा भाऊ समीर रशीम खान याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे (API Sushil Bobade) यांनी करुन आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र (Charge sheet) दाखल केले होते.

मयत अमीन याने आरोपी विजय व अजय गायकवाड याच्याकडून 1 लाख रुपये 30 टक्के व्याजदराने घेतले होते. तर आरोपीचे भाऊ किशोर आणि राजेश गायकवाड हे वसुलीचे काम करत होते.
अमीन याने घेतलेल्या रक्कमेपैकी 50 हजार रुपये फेडले होते.
बाकीच्या रकमेवरील व्याजही तो दरमहा देत होता. घटनेच्या दिवशी व्याज आणि मुद्दल देण्यावरुन त्यांच्यात वाद झाले.
त्यावेळी चारही भावांनी अमिन याला लोखंडी पाईपने बेदम मरहाण केली.
जखमी अवस्थेत अमिन याला ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

 

या प्रकरणात सरकारी पक्षाकडून 12 साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सिद्धांत माळेगावकर, अ‍ॅड. प्रमोद धुळे (Adv. Pramod Dhule), अ‍ॅड. मझहर मुजावर (Adv. Mazhar Mujawar) यांनी काम पाहिले. अ‍ॅड. माळेगावकर यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना कोणत्याही साक्षीदारांनी घटनेच्या समर्थनार्थ उत्तरे दिली नाही.
सादर करण्यात आलेली सर्व साक्षी पुरावे हे ऐकीव माहितीवर आधारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यावरुन प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावे न्यायालयात नाहीत.
त्यामुळे आरोपींची निर्दोश मुक्तता करावी असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायाधिश सुनिल एस. वेदपाठक यांनी आरोपींची निर्दोश मुक्तता केली.

 

Web Title : Pune Court | The acquittal of 3 brothers in the murder case was due to interest money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, जाणुन घ्या

Actress Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू