Actress Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Actress Ketki Chitale | मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) तिच्या वादग्रस्त विधानामुळे (Controversial statement) अनेक वेळा चर्चेत दिसते. सध्या त्या अभिनेत्रीवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. अनेकदा सोशल मिडियावर अभिनेत्री केतकी ही सारखी आपली भुमिका मांडत असते. मात्र, सध्या ती एका आक्षेपार्ह विधानावरुन अडचणीत सापडली आहे. फेसबूकच्या माध्यमातुन तिने वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन तिला आता अटक (Arrested) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन तिच्याविरोधात तक्रार दाखल (FIR) झाली होती.
तसेच, त्यावरुन तिने अटकपूर्व जामीनसाठी (Pre-arrest bail) अर्ज केला.
मात्र, कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.
यावरुन तिला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाली होती केतकी चितळे?

गतवर्षी अर्थात 1 मार्च 2020 रोजी चितळेने एक फेसबूक पोस्ट केली होती.
‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क.
आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी? पण, अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे.
आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत.
आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात.
आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.
असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. यावरुन अनेक जणांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे.

 

अटकपूर्व जामीन फेटाळला..

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 6 डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात.
केतकीच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला होता.
तिच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप (Lawyer Swapnil Jagtap)
यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
9 डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयाने (Thane District Court) अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

Web Title : Actress Ketki Chitale | Increase in the difficulty of actress Ketaki Chitale regarding her arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime News | खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच केला महिला रुग्णावर अत्याचाराचा प्रयत्न