Pune CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | गुन्हा अंगावर घेण्यासाठी सुरेंद्र अगरवालने चालकाला धमकावल्याची पोलिस आयुक्तांची माहिती (Videos)
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) याच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांचा जीव गेला. (Kalyaninagar Car Accident Case)
आरोपीला अवघ्या १५ तासात जामीन मिळाला. या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला . या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Pune CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune)
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्र अगरवाल चालकावर दबाव टाकत होते. ड्रायव्हरने गुन्हा त्याच्या अंगावर घ्यावा यासाठी जबरदस्ती सुरु होती.
दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अपघाताच्यावेळी पोर्श गाडी तू चालवत होता, असं पोलिसांना सांग. गुन्हा तुझ्या अंगावर घे, त्याला पैशांची ऑफर देण्यात आली असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
याबाबत मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) यांना अटक केल्यांनतर आयुक्त यांनी
ही माहिती दिली. आम्ही सांगतो त्याप्रमाणे जबाब द्यायचा असे म्हणत सुरेंद्रकुमार अगरवाल ने ड्राइव्हरला डांबून ठेवले
होते तसेच त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी येऊन ड्राइव्हरच्या कुटुंबीयांची आरडाओरड केल्यानंतर त्याला तेथून घरी घेऊन गेल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली