Pune Crime | पॅथॉलॉजी लॅब सुरू करून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आत्मामलिक रुग्णालय आणि साईधाम मेडिकल हबमध्ये पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या नावाखाली 10 लाख रुपये अनामत रक्कम घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) याप्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमनकुमार बंदोपाध्याय आणि संजय नंदू कोळी (रा. मोतानगर, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहेत. याप्रकरणी मनोज हनुमंत माने (रा. काटेवाडी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

माने यांच्या मालकीच्या बारामती आणि भवानीनगर (Bhavani Nagar) येथे लॅब आहेत. त्यांना कोळी यांनी मी आत्मामलिक रुग्णालय आणि साईधाम मेडिकल हबचा (Saidham Medical Hub) सीईओ असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला तुम्हाला संस्थेतर्फे लॅब चालविण्यास द्यायची आहे म्हणत, त्यांच्यासोबत भाडे करारनामा केला. लॅब चालविण्यास देण्यासाठी फिर्यादी माने यांनी दहा लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यांनी संस्थेच्या खात्यावर वेळोवेळी 10 लाख रुपये जमा केले. त्यानंतर माने यांनी लॅब सुरू करण्याबाबात विचारणा केली असता दोन्ही आरोपींनी टाळाटाळ केली. (Pune Crime)

माने यांनी याप्रकरणी संस्थेचे चेअरमन डॉ. सुमन कुमार बंदोपाध्याय यांच्यासोबत संपर्क साधला.
त्यांनी माने यांना करार रद्द करण्यास सांगितले आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावर दहा दिवसांत दहा लाख
रुपये पाठविण्याचे आश्वासन दिले. पण करार रद्द करूनही कुमार यांनी पैसे पाठविले नाहीत.
पुढे माने यांनी पैशांचा तगादा लावला, पण त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर माने यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली.

Web Title :- Pune Crime | 10 lakhs cheated by lure of pathology lab in baramati pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा