Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक; माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोनावरील (Coronavirus) प्रतिबंधक लसीचे उत्पादन (Corona Vaccine) करणार्‍या सिरम इन्स्टिट्युटमध्ये (Serum Institute Of India) कायमस्वरुपी नोकरी लावण्याच्या आमिषाने (Lure Of Job) दोघा तरुणांची १ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघा पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. (Pune Crime)

 

राजन गवारे आणि त्यांची पत्नी सविता गवारे अशी गुन्हा दाखल झालेल्या पतीपत्नींची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ (Kalepadal) येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४०/२२) दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पूर्वी एका कंपनीत कामाला होते.
तेथील मित्राच्या ओळखीतून राजन गवारे याची ओळख झाली होती.
कोरोनाचा संसर्ग सुरु असताना सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोव्हिशिल्डचे उत्पादन करण्यात येत असल्याने सर्व जगाचे लक्ष याकडे लागले होते.
त्याचा गैरफायदा घेऊन गवारे याने मॅकेनिकल डिप्लोमा झालेल्या फिर्यादीला सिरम इन्स्टिट्युटमध्ये अगोदर कंत्राटावर कामाला घेऊ.
नंतर कायम करु असे सांगितले होते. त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली.
फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघांकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले. आपण माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून त्यामुळे आपण असे लोकांना नोकरीला लावतो़, असे तो सांगत होता. पैसे घेतल्यानंतरही नोकरी न लावल्याने त्यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने फिर्यादीचे ३५ हजार व मित्राचे ३२ हजार रुपये परत केले त्यानंतर उरलेले पैसे परत केले नाही. आता तो फोनही उचलत नसल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक डगळे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 2 youths cheated in order to get a job in Serum Institute president of the Mathadi trade union

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा