Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून 3 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ACB च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून डोनेशन म्हणून तीन हजार पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Thane) जाळ्यात सापडले आहेत. भिवंडी येथील (Bhiwandi) शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी 3500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. (Thane Crime)

याप्रकरणी मुख्याध्यापक (माध्यमिक) दिपक लेले (Secondary Headmaster Deepak Lele) (वय, 55), मुख्याध्यापक (प्राथमिक) आत्माराम वाघ (Primary Headmaster Atmaram Wagh) (वय, 57) आणि शिक्षक सुरेश कुलकर्णी (Teacher Suresh Kulkarni) (वय, 52) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात (Shantinagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथील शांतीनगर परिसरात दादासाहेब दांडेकर हे शासकीय अनुदानित विद्यालय (Dadasaheb Dandekar Government Aided School) आहे. फिर्यादी यांच्या पुतण्याला या विद्यालयात 8 वीच्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी फिर्यादी हे विद्यालयात गेले असता त्यांच्याकडून तीन हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली (Thane Bribe Case). यानंतर फिर्यादी यांनी थेट तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Thane) बुधवारी आणि गुरूवारी पडताळणी केली असता दिपक, आत्माराम आणि सुरेश यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Thane | thane acb takes headmaster and three others in custody over ddemand of donation from student

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन