Pune Crime | कोंढव्यातील तरुणाचा खून करुन फरार झालेल्या 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून 17 वर्षाच्या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी (दि.12) पुण्यातील (Pune Crime) कोंढवा (Kondhwa) परिसरात घडली होती. कार्तिक अनिल जाधव (रा. येवलेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणात दोन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर एका विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक दोनच्या (anti extortion cell) पोलिसांनी केली.

अभिषेक दशरथ पवार (वय-19 रा. भैरवनाथ मंदीराच्या मागे, शिवनेरी नगर, कोंढवा बु.), अजय नरसिंग गरड (वय-19 रा. पाटील वस्ती फोडजाई माता नगर, येवलेवाडी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका विधिसंघर्षित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीत गुरुवारी कार्तिक जाधव याचा डोक्यात,
हातावर, कानावर कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता.
घटनेनंतर मुख्य आरोपी अभिषेक पवार (Abhishek Pawar) व त्याचे साथिदार फरार झाले होते.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे (Police Constable Surendra Jagdale)
यांना आरोपी वाघोली चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाघोली चौकात सपाळा रचून आरोपींना अटक केली.
पुढील कार्यवाहीसाठी कोंढवा पोलीस स्टेशनकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner of Police Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Crime Ashok Morale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Crime Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner of Police Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, महेश साळुंके, प्रविण पडवळ, विजय गुरव, संपत औचरे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | 3 accused arrested by anti extortion cell of crime branch pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळयाबाबत शालिनीताईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘थोरल्यासह धाकटया पवारांचा हात’

Actress MMS leaked | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS व्हिडिओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली – ’माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केला, तुमची बहिण…’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 258 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी