Pune Crime | 42 वर्षीय अनुराधा गोरेंचा मृतदेह खडकवासला धरणात आढळल्याने प्रचंड खळबळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरातील सर्व झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह पुण्यातील (Pune Crime) खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील (Haveli Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह (Dead Body) पाण्याबाहेर काढला. अनुराधा अनिल गोरे Anuradha Anil Gore (वय-42 रा. देशमुख वाडी, न्यु कोपरे, ता. हवेली, जि. पुणे) असे महिलेचे नाव आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

पती, मुलगा व मुलगी झोपलेले असताना अनुराधा या सकाळी लवकर उठून घराबाहेर पडल्या. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली होती. पती अनिल गोरे हे उठल्यानंतर त्यांना अनुराधा घरात दिसल्या नाहीत. त्यांनी दरवाजा उघडण्याच प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यांनी शेजाऱ्यांना फोन करुन दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यांनी अनुराधा यांचा परिसरात शोध घेतला परंतु त्या सापडल्या नाहीत. (Pune Crime)

 

दरम्यान, सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान फिरायला जाणाऱ्या नागरिकांना खडकवासला धरणातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती हवेली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पुणे-पानशेत रस्त्यालगत (Pune-Panshet Road) लागून खडकवासला धरणात पंप हाऊस (Pump House) जवळ असलेला मृतदेह बाहेर काढून फोटो जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवला.

बराच वेळ झाला तरी अनुराधाचा शोध लागला नसल्याने पती अनिल गोरे हे
तक्रार दाखल करण्यासाठी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) गेले.
त्यावेळी तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठवलेला फोटो गोरे यांना दाखवला.
गोरे यांनी तो फोटो ओळखला आणि हवेली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अनिल गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जालिंदर गायकवाड (Jalindar Gaikwad) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 42 year old Anuradha Gore’s body found in Khadakwasla Dam Haveli Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tere Naam | जलपरी बनली ‘तेरे नाम’ची भोळी अभिनेत्री, व्हिडीओमध्ये बिकिनी घालून दिसली पूलमध्ये

 

Maharashtra Rains | मुंबई-पुणेकरांनो विकेंडला घरीच थांबा, IMD कडून ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा

 

Varun Dhawan | वरुण धवनच्या ड्रायव्हर ‘मनोज’ यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय