Pune Crime | आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रस्त्यावरील हॉटेलचं जेवण मागवणं पडलं 50 हजाराला, जाणून घ्या प्रकरण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त (parents birthday) बाहेरून जेवण मागवणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. टिळक रस्त्यावरील (Tilak Road) एका हॉटेलच्या फेसबुक पेजवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर त्यांचा खात्यातून 50 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक (Cheating) केली आहे. Pune Crime | 50 thousand had to order a meal from a hotel on Tilak Road on the occasion of parents’ birthday, find out the case

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (sinhagad road police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढ दिवस होता.
त्यानिमित्त त्यांनी जेवण बाहेरून पार्सल मागविण्याचा विचार केला.
त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना फेसबुक पेजवर (Facebook page) टिळक रस्त्यावरील
एका हॉटेलची जाहिरात दिसली.
या जाहीरातीत एक मोबाइल क्रमांकावर होता. त्यावर त्यांनी संपर्क साधला आणि जेवण मिळेल का?, अशी विचारणा केली.
त्यावेळी समोरून होकार मिळाला आणि फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक आली.
त्यानंतर त्यांना ऍडव्हान्स म्हणून 10 रुपये पाठवण्यास सांगितले.
त्यांनी 10 रुपये पाठवल्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर 49 हजार 740 रुपये ट्रान्सफर झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) हे करत आहेत.

Maharashtra Unlock | महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होणार?

Pune Crime | पुण्यात संपत्तीच्या वादातून सुनेकडून वृध्द सासू अन् पतीला मारहाण, मौल्यवान वस्तूंची तोडफोड करत ‘राडा’

Pune Crime | दरोडयाच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक