Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क 80 व्या वर्षी पुण्यातील वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवलं, पुढं जे घडलं ते भयंकरच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडिलांनी वृद्धापकाळात स्वत:च्या लग्नासाठी वधू-वर सुचक मंडळात (Matrimony Sites) नाव नोंदवल्याचा (Register) राग आल्याने मुलाने जन्मदात्या बापाचा (Father) गळा चिरुन खुन (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) राजगुरुनगर (Rajguru Nagar) शहरात गुरुवारी (दि. 6) सायंकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शंकर रामभाऊ बोऱ्हाडे Shankar Rambhau Borhade (वय-80 रा. नंदादीप हौसिंग सोसायटी, वैशंपायन आळी, राजगुरुनगर, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेखर शंकर बोऱ्हाडे Shekhar Shankar Borhade (वय-47) असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. (Pune Crime)

समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय (Marriage Decision) घेतल्याने याबाबत समाजात समजले तर आपली बदनामी होईल.
तसेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होईल या रागात मुलानं वडिलांच्या गळ्यावर कांदा कापण्याची सुरी फिरवली.
बोथट सुरीने गळा कापेना म्हणून त्याने दगडी वरंवटा तोंडावर, डोक्यात मारुन वडिलांचा खून केला.
यानंतर मुलाने स्वत: खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, माझे वडील शंकर बोऱ्हाडे यांनी परस्पर वधू-वर सुचक मंडळात पैसे भरुन स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली.
नोंदणी करुनही ते माझ्यासोबत खोटं बोलले.
याचा राग मला अनावर झाल्याने मी किचन मधून कांदा कापण्याची सुरी आणून वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला.
मात्र सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही.
म्हणून मी घरात असलेल्या दगडी वरवंट्याने तोंडावर आणि डोक्यात मारुन त्यांचा खून केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव (Police Inspector Satish Kumar Gurav) करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | 80 year old father registered his name in matrimony sites son killed him incident in pune district s of rajgurunagar

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Payments | इंटरनेटशिवाय सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

 

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य

 

Online Money Transfer | आता तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकता