Pune Crime | वृद्धापकाळात आधारासाठी ‘स्थळ’ पाहणार्‍या 81 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची फसवणूक; विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आयुष्यभर काम केल्यानंतर आता उतार वयात जवळ कोणी नाही. अशावेळी काळजी घेणारे कोणी असावे, या भावनेतून त्यांनी ८१ व्या वर्षी जोडीदार (Life Partner) शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लग्नासाठी स्थळ दाखविण्याची फी म्हणून विविध कारणे सांगून तब्बल ९५ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी धायरी (Dhayari Pune) येथे राहणार्‍या ८१ वर्षाच्या वृद्ध नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुलस्वामीनी विवाह मंडळ-शोभा साखरे (Kulaswamini Vivah Mandal-Shobha Sakhare), भाग्यलक्ष्मी विवाह मंडळ-वर्धा (Bhagyalakshmi Vivah Mandal-Wardha), मंजू पवार (Manju Pawar), स्वयंवर विवाह मंडळ (Swayamvar Vivah Mandal), अंकीता भोसले / साळवे (Ankita Bhosale / Salve) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निवृत्त लष्कर अधिकारी (Retired Army Officer) आहेत.
ते घरात एकटेच असतात. त्यांचा सांभाळ करायला कोणी नाही.
उतार वयात आपली देखभाल करण्यासाठी कोणीतरी जोडीदार असावी, या हेतूने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला.
त्यासाठी त्यांनी मुलींसाठी विवाह मंडळाशी संपर्क साधला.
तेव्हा या विवाह मंडळातील महिलांनी त्यांना लग्नासाठी स्थळ पाहण्याचे सांगून त्यासाठी फी म्हणून
व संबंधित महिलांनी विविध खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ९५ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.
मात्र, कोणतेही स्थळ न दाखविता फसवणूक (Cheating Case) केली.
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 81 year-old retired army officer give complaint against 3 woman Sinhagad Police register FIR on Kulaswamini Vivah Mandal-Shobha Sakhare Bhagyalakshmi Vivah Mandal-Wardha Manju Pawar Swayamvar Vivah Mandal Ankita Bhosale / Salve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा