Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडी, उत्तर भारतातील थंडी मंदावली – IMD

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Weather Update | मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतात थंडीचा (Cold) कडाका (Maharashtra Weather Update) जाणवला. त्याचबरोबर पावसाचा (Rain) देखील तडाखा महाराष्ट्राला लागला होता, यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी थंडीची लाट आल्याचे पाहायला मिळाले. मधील काळात थंडीचा कडाका थोडा मंदावला होता. त्यानंतर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. पण उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अजुनही थंडी आहे. तसेच उत्तर भारतात (North India) थंडीची लाट कमी होताना दिसत आहे. याबाबत माहिती भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आली आहे.

 

भारतात एकीकडे थंडीपासून दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे झारखंड आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये आगामी पाच दिवसात सकाळी आणि रात्री विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात (Dhule) आज (शुक्रवारी) तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळ्यामध्ये आज तापमानाचा पारा 6.5 अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाचा कडाका देखील जाणवू लागला आहे. (Maharashtra Weather Update)

दिल्लीमध्ये सध्या हवामान बदलू शकते. दिवसा तापमानात वाढ होऊ शकते, त्यामुळे थंडी कमी होऊन नागरीकांना दिलासा मिळू शकतो. तसेच, सायंकाळी थंडी वाढू शकते.
आगामी काही दिवसात दिल्लीतही थंड वारे वाहू शकतात.
तसेच, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या लगतच्या राज्यांसह पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
त्याचबरोबर आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) बंगालमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
पाऊस थांबल्यानंतर राज्यात थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Update | in north maharashtra the cold has increased again while in north india the cold has decreased weather news update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा