
Pune Crime | सिमेंट ऑर्डरचे पैसे मागण्यास गेलेल्या व्यावसायिकाला दाखवला पिस्तुलाचा धाक, निर्मिती डेव्हलपर्सच्या दोघांवर FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिमेंटच्या ऑर्डरचे 36 लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक (Fear of Pistol) दाखवून परत पैसे मागण्यासाठी आला तर ठोकून टाकीन, अशी धमकी देणार्या निर्मिती डेव्हलपर्सच्या (Nirmiti Developers) दोघांविरुद्ध पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
पंढरीनाथ सुभाष मस्के (Pandharinath Subhash Maske) आणि संतोष सुभाष मस्के Santosh Subhash Maske (दोघे रा. नर्हे) अशी गुन्हा (FIR) दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश शिवनारायण भुतडा Prakash Shivnarayan Bhutada (वय 42, रा. प्राईड कुमार सिनेट, सेनापती बापट रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 30 जुलै 2017 ते 30 मे 2018 दरम्यान घडला होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मिती डेव्हलपर्स यांनी फिर्यादी यांच्या कंपनीकडून सिमेंटची मागणी (Cement) केली. ज्यानुसार फिर्यादी यांनी त्यांची ऑर्डरची पूर्तता केली. मात्र, त्याचे 36 लाख 47 हजार 805 रुपयांचे बिल दिले नाही. फिर्यादी हे पैशांची मागणी करण्यासाठी त्याचे कार्यालयात गेले. तेव्हा संतोष मस्के यांनी फिर्यादीना पिस्टल दाखवून तू जर परत पैसे मागण्यासाठी आला तर तुला ठोकून टाकीन, अशी ठार मारण्यासाठी भिती दाखवून धमकी (Threat to Kill) दिली. वेळोवेळी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे (API Kendre) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A businessman who went to demand money for a
cement order was pistol-whipped, FIR against two construction developers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Maharashtra Recruitment | शिंदे-फडणवीसांचा मोदी फॉर्म्युला! येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75000 नोकऱ्या देण्याचा सरकारचा दावा
- Pune Crime | व्यावसायिकाचे अपहरण करुन दीड लाखांची खंडणी उकळणार्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक
- Kishori Pednekar | भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांना किशोरी पेडणेकरांनी सुनावले, म्हणाल्या – ‘ठाकरेंच्या दौर्यासाठी तुम्ही घड्याळ लावून…’