Pune Crime | 7 वर्षाच्या मुलाला मारहाण करणार्‍या ‘लेडी’ म्युझिक टीचरवर गुन्हा दाखल; विमाननगर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | वर्गातील मुलांमध्ये झालेल्या भांडणात एका ७ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला दुखापत करण्याचा प्रकार लोहगावमधील एका शाळेत घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimannagar Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. ३५६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शाळेतील लेडी म्युझिक टीचरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना लोहगांव येथील वडगाव शिंदे रोडवरील एका शाळेत १५ सप्टेबर रोजी घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ७ वर्षाचा मुलगा या शाळेत शिकत आहे.
त्याची व वर्गातील मुलांमध्ये भांडण झाल्याचे पाहून शाळेतील म्युझिक टीचर ने फिर्यादी यांच्या मुलास तोंड जोरात
दाबून त्याच्या ६ ते ७ कानफाटीत मारल्या.
त्याची डायरी फेकून मारली़ उजवा हात पिरगळला. आणि दोनदा भिंतीवर डोक आपटले.
“तू हे कोणाला सांगितले तर तुला क्लासमधून  काढून टाकीन” अशी भिती घातली.
या प्रकारामुळे मुलाचे डोके दुखत असून तो आजारी पडला.
त्यानंतर त्याच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक निगुडकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been filed against the ‘lady’ music teacher who beat up a 7-year-old boy ;FIR at Vimannagar police station