Pune Crime | बड्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी, माजी नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

पुणे : Pune Crime | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्व कल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचा (BJP) पदाधिकारी व माजी नगरसेवकावर (Former Corporator) चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले Ramkrishna Govindswami Pillai ऊर्फ राजेश पिल्ले Rajesh Pillai (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माजीनगरसेवकाचे नाव आहे.
याबाबत संजयदयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद
(गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. हा प्रकार चर्‍होली बु येथील जमीनीबाबत ५ फेब्रुवारी २०१९ ते मे २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहे.
त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले हे प्रिंसिपल एजंट (विश्वस्त प्रतिनिधी) म्हणून काम करत होते.
त्याने चर्‍होली येथील ९५ आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्व कल्पना
न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे व धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली.
ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़ पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | A case has been registered against a former corporator, an office bearer of a big political party for defrauding him of 15 crores

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा