Pune Crime | ‘आरएसएस संघराज्य’ या फेक खातेधारकावर पुण्यात FIR, जितेंद्र आव्हाडांनी केली होती कारवाईची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘आरएसएस संघराज्य’ (RSS Sanghrajya) या नावाने फेक अकाउंट उघडून त्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), जिजामाता (Jijamata) यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते. यासंदर्भात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ‘आरएसएस संघराज्य’ या नावाने फेक अकाउंट उघडून लिखाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

यासंदर्भात महेश संभाजी करपे Mahesh Sambhaji Karpe (वय – 50 रा. चंदननगर) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, 14 ऑगस्ट रोजी एका टीव्ही चॅनलवर बातम्यांचे थेट प्रसारण सुरु होते. त्यावेळी ‘आरएसएस संघराज्य’ या खातेधारकाने लाईव्ह चॅटमध्ये (Live Chat) शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता यांच्यासंदर्भात अत्यंत बीभत्स मजकूर लिहून महापुरुषांची बदनामी केली. तसेच आरएसएस बाबत जनमानसात गैरसमज पसरवून दोन वर्गात द्वेष पसरवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन पुणे सायबर पोलिसांनी ‘आरएसएस संघराज्य’ या खातेधारक विरुद्ध आयपीसी 153 अ, 465,, 469, 500, 505(2) यासह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार (Information and Technology Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहे.

 

जितेंद्र आव्हाडांकडून कारवाईची मागणी

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी एका बातमीचा स्क्रिनशॉट ट्विटरवरुन शेअर करत याची नोंद पोलीस महासंचालक (DGP), मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी घ्यावी तसेच हे अकाउंट कोणाचं आहे याची माहिती घ्यावी अणि कारवाई करावी, असं आवाहन करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टॅग केलं आहे.

 

काय आहे पोस्टमध्ये

जितेंद्र आव्हाड यांनी बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला असून यामध्ये बातमीवरील लाईव्ह चॅट सेक्शनमध्ये RSS ! संघराज्य नावाच्या अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली आहे.
या अकाउंटवरुन सलग चार कमेंट करण्यात आल्या असून त्यामध्ये शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare),
श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate), शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), जिजामाता (Jijamat),
दादोजी कोंडदेव (Dadoji Konddev) यांचा उल्लेख केला आहे.

 

 

Web Title : – Pune Crime | a case has been registered against the fake account holder of rss sanghrajya pune crime news today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा