Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून अटक करण्याची भिती दाखविली. या त्रासाला कंटाळून जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) दोघा पोलीस कर्मचार्‍यासह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

किरण भातलावंडे Kiran Bhatlawande (रा. गवळी वस्ती, मांजरी) आणि सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम (Police Constable Bhagyawan Gyandev Nikam) व पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे Police Constable Sachin Ramchandra Barkade नेमणूक समर्थ पोलीस ठाणे – Samarth Police Station) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राजेंद्र राऊत (Rajendra Raut) असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची कन्या वैष्णवी राजेंद्र राऊत Vaishnavi Rajendra Raut (वय २३, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६४/२२) दिली आहे. ही घटना नाना पेठेतील राऊत यांच्या घरी सोमवारी सकाळी ६ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भातलावंडे हा फिर्यादी यांचे वडिल राजेंद्र राऊत यांच्या मित्र होता.
किरण याने रघुवीर बिजनेस प्रा. लि. हैदराबाद (Raghuveer Business Pvt. Ltd. Hyderabad) यांच्याकडून टाटा सुमो विक्टा (Tata Sumo Victa) ही गाडी घेतली होती.
त्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी राजेंद्र राऊत हे जामीनदार होते.
परंतु किरण याने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सहायक पोलीस फौजदार भाग्यवान निकम व हवालदार सचिन बरकडे हे राजेंद्र राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट (Court Warrant) बजावण्यासाठी येत होते.
ते त्यांना अटक करण्याची भिती दाखवत होते.
अटक होऊ नये, या भितीने त्यांनी वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये दिले होते.
या सर्व त्रासामुळे राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले.
तेव्हा किरण याने कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली. या त्रासाला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सकाळी
६ वाजता घराबाहेरील पॅसेजमध्ये नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (Deputy Commissioner of Police
Priyanka Naranaware) व अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी (Assistant Police Inspector Mali) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been registered against three persons including two policemen in connection with the suicide of a surety

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? याचे विश्लेषण सामनातील ‘रोखठोक’ सदरातून करा; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख