Pune Crime | मैत्रिणीवर 18 वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वादातून मैत्रिणीवर चाकूने सपासप वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणाऱ्या मित्राला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. हेडाऊ (Additional Sessions Judge S. B. Hedaoo) यांनी जन्मठेप (Life Imprisonment) आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना (Pune Crime) 15 जून 2015 रोजी रात्री अडीचच्या सुमारास कोथरुड परिसरातील त्रिमूर्ती कॉनलीत घडली होती.

 

स्वप्नील रघुनाथ कुंभार Swapnil Raghunath Kumhar (वय 28, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली होती. याबाबत तरुणीच्या वडिलांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण ओंबासे (Police Inspector Arun Ombase) यांनी केला होता. (Pune Crime)

 

या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Prem Kumar Aggarwal) यांनी काम पाहिले.
सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
वैद्यकीय अधिकारी आणि तरुणीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.

न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन कुंभारला जन्मठेप, एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास दोन वर्ष सक्तमजुरीची तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.
दंडातील 75 हजार रुपये तरुणीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी विनय पानसरे यांनी सहाय केले.

 

Web Title :- Pune Crime | A friend who tried to kill his girlfriend by stabbing her 18 times was sentenced to life imprisonment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

DGP Rajnish Seth | ‘कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…