Pune Crime | प्रेमप्रकरणातून विवाहीत तरुणाची आत्महत्या, तरुणीविरोधात FIR; येरवडा परिसरातील घटना

ADV

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमप्रकरणातून (Love Affair) एका 24 वर्षीय विवाहीत तरुणाने आत्महत्या (Pune Crime) केल्याचा प्रकार येरवडा भागात घडला आहे. हरीश प्रेमकिशन पवार Harish Premkishan Pawar (वय 24, रा. लष्कर) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

ADV

हरीशच्या आईने याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हरीश विवाहीत आहे. आरोपी तरुणीने हरीशसोबत मैत्री केली होती. हरीश विवाहीत असल्याची माहिती तरुणीला होती. तरी देखील तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हरीश आणि त्याच्या पत्नीत दुरावा यावा यासाठी तिने हरीशच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. (Pune Crime)

 

हरीश एका खासगी कंपनीत कामाला होता. तरुणी हरीशच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याला त्रास देऊ लागली.
माझ्या सांगण्याप्रमाणे वागायचे, असे आरोपी तरुणीने हरीशला धमकावले होते.
तरुणीच्या त्रासाला कंटाळून हरीशने कल्याणी नगर येथील पूलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली,
असे हरीशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हरीशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर (API Ravindra Alekar) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a married young man commits suicide by jumping into a river in love affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट