×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची...

Pune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची तोडफड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करुन दुकानाची तोडफोड केली. तसेच वाहनांची तोडफोड करुन हवेत कोयते फिरवून टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Crime) सोमवारी (दि.21) रात्री 9.45 ते 11.45 च्या सुमारास मुंढवा येथील केशवनगर मध्ये घडला.

आदित्य कांबळे, आकाश अनिल जाधव, अनिकेत सुनिल पुरी, सोहेल शब्बीर शेख (सर्व रा. केशवनगर) आणि एका अनोळखी आरोपी विरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 452, 384, 506(2), 427, 34, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमाराम दुर्गाराम चौधरी (वय-43 रा. शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य कांबळे व त्याचा मित्र हे फिर्यादी यांच्या हरीओम ट्रेडींग कंपनी या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवुन पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानातील सामानाची तोडफोड केली. यानंतर आरोपींनी PMPML, स्वीफ्ट आणि एका मिनी बसच्या काचांवर कोयत्याने मारुन तोडफोड केली.

टोळक्याने गाड्यांची तोडफोड केल्यानंतर हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत माजवली.
तसेच जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी आकाश जाधव, अनिकेत पुरी, सोहेल शेख व इतर दोघांनी
कौशिक कुमार रेड्डी याच्यावर वार केले. यामध्ये रेड्डी हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाश जाधव, सोहेल शेख आणि
अनिकेत पुरी यांना अटक केली. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title :- Pune Crime | A mob ransacked in Mundhwa, vandalized cars by stabbing one of them with a coyote

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

Must Read
Related News