Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाच्या पैशांसाठी मारहाण केल्याने एकाने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. हि घटना म्हाळुंगे परिसरात घडली असून धंनजय रेड्डी असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी (Pune Crime) लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे मागत होते. त्यांनी तगादा लावला होता. त्रास देऊन मारहाण ही करत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच चिठ्ठीत सूरज याच्या नावाचा उल्लेख केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी व्याजाने पैसे देणारा सूरज गुरव याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी फिर्याद धंनजय रेड्डी यांचा भाऊ योगेश रेड्डी यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी बंधूची चाकण परिसरात कंपनी असून ती चालवण्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी त्यांनी सूरज गुरवकडून १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकांकडूनही त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे घेताना धनंजय याने मध्यस्थी केली होती. दरम्यानच्या काळात परिस्थिती खालावल्याने वेळेत व्याज देता येत नव्हते. त्यामुळे सूरज गुरव याने योगेश यांना गाडीत बळजबरीने बसवून नेऊन त्यांना मारहाण करत धमकावले होते. याच त्रासाला कंटाळून भाऊ धंनजय यांनी बंद फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Web Titel :- Pune Crime | a person suicide after beating for interest money in chakan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन्पो लिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’