Pune Crime | वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या कामगाराला चोर समजून बेदम मारहाण, 6 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) सुरु असताना शेडच्या मागील बाजूने जाण्याचा प्रयत्न करत असताना एका कामगाराला (Worker) पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी (दि.25) पहाटे तीनच्या सुमारास धायरी येथील लेबर कॅम्प (Labor Camp Dhairi) येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगारावर सध्या पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) आयपीसी 307 सह दंगलीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.

या घटनेत गणपतसिंह केवलसिंह मेरावी (वय 38 वर्ष रा. लेबर कॅम्प, चव्हाण बाग, आमराई गार्डन, धायरी पुणे, मूळ रा. बालाघाट मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत गणपतसिंह याचा मित्र सुक्कलसिंह फुलसिंह मेश्राम (वय 35) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe)
यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील डी.एस.के. स्कूल जवळ (D.S.K. School) असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये लेबर कॅम्प आहे.
त्याठिकाणी काही मध्य प्रदेशातील कामगार राहतात.
लेबर कॅम्पपासून पाचशे मीटर अंतरावर सनी चव्हाण (Sunny Chavan) याचा वाढदिवस करण्यासाठी तेथे त्याचे काही मित्र जमले होते.
गणपतसिंह याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो सनी सुरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या शेडच्या मागील बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होता.
त्यावेळी आरोपींनी हा चोरी करण्याच्या हेतूने आलेला आहे असा समज करून त्याला जीवे ठार मारण्याच्या हेतूने लाथा बुक्क्याने मारहाण करुन बेशुद्ध केले.

दरम्यान तो निपचित पडल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.
याबाबत सिंहगड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी गणपतसिंह याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सध्या तो बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A worker who came to a birthday party was beaten up as a thief, 6 people were detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Beed ACB Trap | 7000 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

LIC Policy Rules | एलआयसी पॉलिसीचे हे काम लवकर करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, बदलले नियम; जाणून घ्या