Pune Crime | पूर्वमैनस्यातून मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मंगळवार पेठेतील आनंदनगर परिसरात तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची (Pune Crime) घटना घडली. याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

पवन करताल, दीपक परदेशी, फैजल (तिघे रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मयूर बाळासाहेब चव्हाण (वय ३२, रा. आनंदनगर, मंगळवार पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

मयूर चव्हाण आणि आरोपी करताल, परदेशी, फैजल यांच्यात वाद झाले होते. चव्हाण आणि त्याचा मित्र विनोद जाधव मंगळवार पेठ परिसरात थांबले होते.
आरोपींनी चव्हाणचा मित्र अभिषेक पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली.
चव्हाणने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी चव्हाणवर कोयत्याने वार केला.
चव्हाणने वार हुकवला आणि तो तिथून पळाला.
त्यावेळी आरोपींनी अभिषेक याच्या पाठीत रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू फेकून मारला. आरोपींनी परिसरात दहशत माजवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A young man was stabbed with a coyote in Peth on Tuesday from Purva Mainsya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…,  नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप