Pune Crime | टिंडर अ‍ॅपवर झाली ओळख, बलात्कार करुन उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Crime | टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर (Tinder Dating App) ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून युवतीवर बलात्कार (Rape In Pune) केला. यानंतर शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार 2018 ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सक्सेना Akash Saxena (वय-38 रा. रोहन मिथिला, हाऊस नं.19, विमाननगर) याच्यावर आयपीसी 376, 377, 383, 417, 420, 506, 504, 500 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 37 वर्षीय युवतीने मंगळवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची 2018 मध्ये टिंडर या डेटिंग अ‍ॅपच्या
माध्यमातून ओळख झाली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship)
ठेवले. तसेच फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत अनैसर्गिक संबंधही ठेवले.
आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर विविध बँकांमधून कर्ज काढले.
शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन चार लाख रुपये खंडणी मागितली.
फिर्यादी यांनी घाबरून त्याला 50 हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | a young woman was raped by an acquaintance on tinder and the video was threatened to go viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CBI Raid | राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयकडून चौकशी

Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल