Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आले (Pune Crime) आहे.

ऋषिकेश सुरेश पवार (वय 23, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाणे (Loni Kalbhor Police) नुकतेच पुणे आयुक्तालयात वर्ग झाले आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या भागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, ऋषिकेश पवार लोणी काळभोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याने व त्याच्या
साथीदारांनी गावठी पिस्तुल यासह घातक हत्यारे घेऊन गुन्हे केले आहेत. 2017 पासून त्याने 6 गुन्हे
केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे परिसर दहशतीत असायचा. तर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करत नव्हते.

त्याच्या गुन्हेगारी कृत्याला लगाम घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior
Police Inspector Rajendra Mokashi) यांनी एमपीडीएनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव
उपायुक्त नम्रता पाटील (deputy commissioner of police namrata patil) यांच्या
कार्यालयात पाठवला. त्यांनी या प्रस्तावाची पाहणीकरून तो अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण
(additional commissioner of police namdev chavan) यांच्याकडे पाठवला. त्यांनी
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta)
यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबध्द
करण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्त गुप्ता यांनी मध्यवस्तीत सक्रिय असलेल्या दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहेत. गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये 31 गुन्हेगारांना आयुक्तांनी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध केले आहे.

हे देखील वाचा

Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 24 लाखांचे भाडे थकवले, कारवाईची शक्यता

Chiplun Flood | कोकणात पावसाचा कहर ! चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती, अनेक घरे पाण्याखाली; 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Action taken by the pune police Commissioner amitabh gupta against the criminals in Loni Kalbhor area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update