Pune Crime | पुण्यातील आंबेगावमधील दुर्दैवी घटना ! ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावर कोसळल्याने सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) अंगावर कोसळल्याने दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यु (Died) झाल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon) मेंगडेवाडी येथे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये दोघी बहिणी बसल्या. त्यानंतर तीव्र उतारा आल्याने ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे (Jijabai Pandharinath Dudhwade) व भिमाबाई यादव गांडाळ (Bhimabai Yadav Gandal) असं दोन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. हा अपघात मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबेगाव येथील निरगुडसर येथील महादू शंभू वळसे (Mahadu Shambhu Valase) यांच्या शेतातील ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस ट्रॅक्टर मध्ये भरला. ऊस विक्रीसाठी घेऊन जात असताना भरलेल्या ऊस ट्रॅक्टरमध्ये जिजाबाई दुधवडे आणि भिमाबाई गांडाळ या दोघी ट्रॅक्टरमध्ये बसल्या. मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर ट्रॅक्टरवरीला चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली सह पलटी झाली. (Pune Crime)

 

दरम्यान, या भीषण अपघातात (Accident) ट्रॅक्टरट्रॉली दोघी बहिणींच्या अंगावर कोसळला. त्या दोघेही उसाखाली चिरडल्या. त्यामध्ये एका बहिणीचा जागीच मृत्यु (Died) झाला तर दुसऱ्या बहिणीचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यु झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी ट्रॅक्टर चालकांच्या विरोधात मंचर पोलिसात (Manchar Police) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. या घटनेमुळे मेंगडेवाडीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था समोर आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | ambegaon a trolley full of sugarcane fell on sisters pune accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा हात ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले – ‘तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच पण… ‘

 

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या मदतीने 27 वर्षाच्या तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार; पाषाण परिसरातील घटना

 

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती (व्हिडीओ)