Pune Crime | पुण्यात पत्नीच्या मदतीने 27 वर्षाच्या तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार; पाषाण परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीबरोबर घटस्फोट (Divorce) झाला असून ती पैशासाठी माझ्याबरोबर राहते, असे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखविले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले व पत्नीच्या मदतीने तिचे न्यूड फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल (Viral On WhatsApp) करुन बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी पाषाण (Pashan) येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल गायकवाड Vishal Gaikwad (वय ४७, रा. पॅराडाईज व्हिला, एन आय बी एम रोड, कोंढवा – Kondhwa) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१८ पासून २ फेब्रुवारी दरम्यान टर्फ क्लब हाऊस (Turf Club House Pune) , कॅम्प (Camp Pune) व पाषाण येथील फिर्यादीच्या घरी घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे व्यवसायामध्ये गुंतवणुक (Investment) करायची आहे, असे म्हणून त्यांच्याशी जवळीक साधली. त्याने त्यांची पत्नी हिचेबरोबर पटत नसून आमचा घटस्फोट झाला आहे. ती फक्त माझ्यासोबत पैशांसाठी राहत असे खोटे सांगितले. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक (Cheating Case) करुन वेळोवेळी तिच्या संमतीशिवाय तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Rape In Pune) ठेवले. माझ्यासोबत राहिली नाहीस तर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या लाँड्रीच्या दुकानात (Laundry Shop) येऊन तेथील कामगारांना बाहेर काढून येथे कोणी काम करायचे नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीचे लग्नानंतर तिच्या पतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी व आरोपी विशाल गायकवाड यांचे न्युड फोटो तसेच फिर्यादीस मारहाण करातानाचे फोटो व्हॉटसअ‍ॅप करुन फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीने तक्रार दिली तर जीवंत ठेवणार नाही,
अशी धमकी देऊन हाताने तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, with the help of his wife, man viral objectionable photo of a 27-year-old girl Incidents in the pashan area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती (व्हिडीओ)

 

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीने अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेची केली ‘गेम’

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ शानदार योजनेत लावा 7500 रुपये! करोडपती बनून व्हाल निवृत्त; जाणून घ्या युक्ती