Pune Crime | दिवसाढवळ्या पीएमपीएल बस चोरीचा केला प्रयत्न, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महानगरपालिकेजवळील पीएमपीएल स्थानकातून (PMPL Station) दोघांनी दिवसाढवळ्या बस पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 15 ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक (Arrest) केली.

सुरज शशिकांत जडिये Suraj Shashikant Jadiye (वय -35 रा. कोथरूड) आणि मोहित अविनाश चव्हाण Mohit Avinash Chavan (वय -26, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जालिंदर खंडाळे Jalandar Khandale (वय -27  रा. पर्वती ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर हे महानगरपालिकेजवळील (PMC) पीएमपीएल थांबा परिसरात सुरक्षारक्षक आहेत. 15 ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास आरोपी सुरज आणि मोहित यांनी परिसरातील बसक्रमांक एमएच 14 आयएन 6208 ही बस गेटच्या विरूद्ध दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जालिंदरने बसचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. दोघा चोरट्यांनी बस घेउन जाताना केबीनचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे (PSI V. K. Shinde) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | An attempt was made to steal a PMPL bus in broad daylight, two were arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा