पुणे : Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने आपल्या साथीदार मजूराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून (Murder in Pune) करण्यात आला. पुचु मनधुवा मुरमु (वय ४९, रा. कुमार पॉप्रर्टिज साईट, मगरपट्टा) असे खून झालेल्याचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) संजय कुनु चौरसिया (वय १९, रा. लेबर कॅम्प, मगरपट्टा, मुळ उत्तर प्रदेश) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)
याप्रकरणी सद्दाम हुसेन (वय ३१, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुचु व संजय हे दोघे अॅमनोरा मॉलच्या बाजूला असलेल्या कुमार प्रॉपर्टीज यांच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये राहतात. दोघेही फिर्यादीकडे लेबर काम करीत असत. संजय हा नेहमी दारु पिण्यासाठी पैसे मागत असे. पैसे दिले नाही तर तो पुचु याला मारहण करीत असल्याचे त्याने फिर्यादी यांना सांगितले होते. सोमवारी मध्यरात्री संजय याने पुचु याच्याकडे दारुन पिण्याकरीता पैसे मागितले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात संजय याने बाजुला पडलेल्या लोखंडी रॉडने पुचु यांच्या डोक्यात मारुन त्यांना जीवे ठार मारले. याची माहिती सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजता पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी शोध घेऊन संजय चौरसिया याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील (Sub-Inspector of Police Kaviraj Patil) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attacked and murdered with an iron rod for not paying for liquor
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार