Pune Crime | तलवारीला धार लावून न दिल्याने तरुणावर वार, टोळक्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तलवारीला (Sword) धार लावून न दिल्याच्या रागातून एका टोळक्याने तरुणावर वार केल्याची घटना पुण्यातील येरवडा येथे घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) टोळ्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवडा येथील सुभाषनगर (Subhas Nagar) भागात घडली (Pune Crime) आहे.

 

टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शाकिब मलिक Shakib Malik (वय-24 रा. येरवडा) हा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी (Pune Police) हरजीत सिंग Harjeet Singh (रा. पोते वस्ती, येरवडा) याच्यासह तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. येरवडा येथील सुभाषनगर परिसरातील एका फॅब्रिकेशन (Fabrication) येथे जखमी मलिक कामाला आहे. आरोपी हरजीत सिंग आणि त्याचे साथीदार मलिक याच्याकडे आले. त्यांनी तलवार आणि चाकूला धार लावण्यास सांगितले. मात्र, मलिक याने धार लावण्यात नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी मलिक याच्यावर तलवारीने वार केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder In Yerwada Area Of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ola Electric Car | Ola च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टीजर व्हिडिओ जारी, दमदार आहे तिचा फ्यूचरिस्टिक लुक

 

India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्‍यांना भरावा लागेल नवीन चार्ज

 

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे