Pune Crime | पोलिसांवर दबाव आणण्यासाठी पोलीस ठाण्यात तिघांचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून त्यातील तिघांनी स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (attempt commit suicide) केल्याची धक्कादयक घटना पुण्यात (Pune Crime) घडली. यावेळी त्यांना अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना पुण्यातील (Pune Crime) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) घडली.

याप्रकरणी शंकर तानाजी धायगुडे (वय-23), संतोष सुरेश माळी (वय-30), रतन तानाजी धायगुडे (वय-52), दुर्गेश तानाजी धायगुडे (वय-25), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय-25) शुभम सुदाम विरकर (वय-20), संगीता शिवाजी धायगुडे (वय-48) आणि अंजना मारुती धायगुडे (वय-58 सर्व रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार संतोष मारुती होले (Police Constable Santosh Maruti Hole) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
हा प्रकार मंगळवार (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी रात्री अचानक पोलीस स्टेशनच्या आवारात अचानकपणे आले व आमच्यावर कारवाई (Action) कशी करता.
असे म्हणत आरडाओरडा (Pune Crime) केला. यावेळी घोषणाबाजी करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
या संदर्भात पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, एकाने तुम्ही माझ्याविरोधात तक्रार कशी दाखल करुन घेतली.
तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता बघू.
मी तुम्हाला बघून घेतो, असे म्हणत प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले डिझेल (Diesel) अंगावर ओतून घेतले.
काडेपेटी आणून दे, मी आत्ता पेटवून घेऊन जीव देतो, तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता ते बघून घेतो, असे म्हणाला.
त्याचवेळी त्याच्यासोबत आलेल्या एकाने तू अंगावर डिझेल ओतून घे, काय आहे ते मी बघून घेतो, असे म्हटले.
दुसऱ्या व्यक्तीने बाटलीतील डिझेल अंगावर घेतलेले पाहून एका महिलेनेही अंगावर डिझेल ओतून काडीपेटी दे, म्हणत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

 

या सर्वांना सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे (PSI Bhagwat Shendge), निकेतन निंबाळकर, संतोष होले,
महिला पोलीस हवालदार वैशाली निकंबे व गुन्हे शोधक पथकाली अंमलदार यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, उलट आरोपींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला.
पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला.
यामुळे 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | Attempted suicide by setting fire to three persons at loni kalbhor police station to put pressure on police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | भाजपच्या नेत्याने थेट किरीट सोमय्यांनाच पालिकेत आणल्याने शहर भाजप नेतृत्वाच्या ‘क्षमते’बाबत उलटसुलट चर्चा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,139 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी