Pune Crime | कुख्यात गुंडास कोरोना लस देण्यास शिफारस केल्याच्या गुन्ह्यात एकाला जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील लोणी काळभोर (Loni kalabhor) येथील कुख्यात गुंड शुभम कामठे (Criminal Shubham Kamath) याला कोरोनाची लस (Corona vaccine) देण्याची शिफारस केल्याप्रकरणी पाच जणांना अटक (Pune Crime) केली होती. याप्रकरणात कुंजीरवाडीच्या सरपंच (Kunjirwadi Sarpanch) अंजू गायकवाड (Anju Gaikwad) यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यांची नुकतीच जामीनावर (bail) सुटका झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय गुलाब गायकवाड (Ajay Gulab Gaikwad) याला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (Additional Sessions Court) न्यायाधीश नावंदर (Judge Navander) यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

 

आरोपी अजय गायकवाड याने अ‍ॅड. प्रसाद निकम आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्जे केला होता. आरोपीच्या वतीने न्यायायात युक्तीवाद करताना, आरोपीची गुन्ह्यात भूमिका नाही आणि तो गुन्हेगार नाही. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. तसेच गुन्ह्यामध्ये आरोपीचा सहभाग होता हे दाखवणारे पुरावे नाहीत. तसेच अर्जदारच या गुन्ह्याचा (Pune Crime) पक्ष आहेत असा निष्कर्ष काढणे पुरसे नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश नावंदर यांनी आरोपीची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका केली. सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. निकम आणि अ‍ॅड. देव यांना अ‍ॅड. कोमल अंगारखे (Adv. Komal Angarkhe), अ‍ॅड. नेहा जाधव (Adv. Neha Jadhav), अ‍ॅड. सिद्धार्थ चव्हाण (Adv. Siddharth Chavan), अ‍ॅड. मंसूर तांबोळी (Adv. Mansoor Tamboli), अ‍ॅड. पूजा कांबळे (Adv. Pooja Kamble) यांनी मदत केली.

 

काय आहे प्रकरण ?

शुभम कामठे हा लोणी काळभोर हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोक्का (MCOCA Action) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळात त्याला लस देण्यासाठी अंजू गायकवाड यांनी कुंजीरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिफासर केली होती. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar police) अंजू गुलाब गायकवाड, यांच्यासह त्यांचा भाऊ व कुंजीरवाडीचा माजी ग्रामपंचायत सदस्य अजय गुलाब गायकवाड, विका म्हस्के, मेघराज वाल्मिक काळभोर व योगेश रविंद्र काळभोर यांना अटक केली होती.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to one of the notorious thugs for recommending corona vaccine

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

How To Become Rich | श्रीमंत व्हायचंय का? अवलंबा ‘या’ 10 दमदार पद्धती, बदलून जाईल संपूर्ण जीवन

Income Tax Raid | IT अधिकारी 100 तासांपासून पार्थ पवारांच्या ऑफिसमध्ये तळ ठोकूनच

CBI नं महिला पोलिस अधिकार्‍यासह 2 पोलीस कर्मचार्‍यांना केली अटक; बलात्काराच्या आरोपीकडून लाच घेतल्याचा आरोप