Income Tax Raid | IT अधिकारी 100 तासांपासून पार्थ पवारांच्या ऑफिसमध्ये तळ ठोकूनच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) कार्यालयावर आयकर विभागानं छापा (Income Tax Raid) टाकला आहे. आज सलग 100 तासांपासून आयकर विभागाची धाड (Income Tax Raid) सुरु असल्याचे सुत्रांकडून समजतेय. पार्थ पवार यांच्या कार्यालय कागद पत्रांची पडताळणी सुरुच आहे. नरीमन पॉईंट (Nariman Point) येथील निर्मल भवन इथल्या सीड ट्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही छापेमारी सुरु आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाकडून धाडीसत्र (Income Tax Raid) सुरु आहे. यात आयकर विभागानं पुणे (Pune), सातारा (Satara), अहमदनगर (Ahmednagar), कोल्हापूर (Kolhapur), नंदूरबार आणि मुंबईत (Mumbai) धाडी मारल्या आहेत. पार्थ पवारांच्या मुंबईतल्या कार्यालयात आयटीकडून सलग चौथ्या दिवशी कारवाई असल्याचे समजतेय. आज (रविवार) साकाळी पुन्हा सात वाजल्यापासून आयकर अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी कार्यालयात 6 ते 7 अधिकारी अजूनही कारवाई करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाचे (Income Tax Raid) सर्व कर्मचारी तयारीनिशी दाखल झाले. आयटीच्या अधिकाऱ्यांनी काल फोल्डर आणि अतिरिक्त एनव्हलप मागवल्याची माहिती आहे. पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाच्या सात ते आठ अधिकाऱ्यांनी तीन रात्र घालवल्या आहेत.

 

 

दरम्यान, अजित पवार यांच्या बहिणीच्या (Ajit Pawar Sister) घरी आयकर विभागाने धाड टाकली.
नंदुरबारमधील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर करखान्यावरही (Multitrade LLP Sugar Factory) छापा टाकण्यात आला होता.
तब्बल 70 तासानंतर आयटी विभागाचे पथक कारखान्या बाहेर आले आहे. तीन दिवसानंतर करावाई संपुष्टात आली आहे.
काल 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या कारखान्यातून बाहेर पडल्या आहेत.
या कारवाईत नेमकं काय मिळालं याबाबत बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

 

Web Title :- Income Tax Raid | ajit pawar son parth pawar office income tax raid contiune from hundred hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CBI नं महिला पोलिस अधिकार्‍यासह 2 पोलीस कर्मचार्‍यांना केली अटक; बलात्काराच्या आरोपीकडून लाच घेतल्याचा आरोप

Pune Rains | माजी आमदार मोहन जोशी यांची पुणे BJP वर खरमरीत टीका; म्हणाले – ‘पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा’

Moshi-Chandoli Toll Plaza | मोशी आणि चांडोली येथील दोन्ही टोलनाके कायमस्वरूपी बंद !

Jalgaon Police Recruitment | WhatsApp च्या माध्यमातून पोलिस भरतीचा पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं (व्हिडीओ)

Earn Money | दरमहिना पाहिजे असेल मोठी कमाई तर मोफत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’