Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसास मारहाण; पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैदानावर सुरु असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण (Pune Crime) केल्याप्रकरणी तिघांना अटक (Arrest) केली आहे. प्रितम उर्फ बिक्षु नंदु आवतारे (Pritam alias Bikshu Nandu Avatare), गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड (Gaurav alias Kaichi Jyotiram Jogdand), आकाश शिवाजी आवतारे (Aakash Shivaji Avatare) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

 

याबाबत पोलीस शिपाई (Police Constable) उमेश देवचंद वानखडे (Umesh Devchand Wankhade) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.14) रात्री पावणे नऊच्या सुमारास दळवीनगर झोपडपट्टी (Dalvinagar Slum) जवळील मोकळ्या मैदानात घडला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण (Obstructing Government Work) केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रितम उर्फ बिक्षु नंदु आवतारे (वय-22 रा. क्रांतीनगर, बारणे चाळ, थेरगाव-Thergaon), गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड (वय-19 रा. समाज मंदीराजवळ, दळवीनगर), आकाश शिवाजी अवतारे (वय-20 रा. दळवीनगर झोपडपट्टी) यांना अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दळवीनगर झोपडपट्टी येथील मोकळ्या जागेत कोणत्यातरी कारणावरुन हातात हत्यारे घेऊन भांडण करत होती. फिर्यादी वानखेडे यांना काही लोक हातात हत्यारे घेऊन भांडण करत असल्याचे दिसल्याने ते भांडण सोडवण्यासाठी सहकाऱ्यासोबत त्याठिकाणी गेले. त्यांनी आरोपींना पोलीस असल्याचे सांगून देखील त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या सहकार्यास शिवीगाळ करुन दगड व लाथा मारुन जखमी केले. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Beating of policemen who went to settle the dispute; Incidents in Pimpri-Chinchwad area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा