Pune Crime | आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग, बिटेक इंजिनिअर बनला अट्टल चोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नुकतीच आयपीएलची स्पर्धा (Tata IPL 2022) संपली. आयपीएलच्या क्रिकेट समान्यांवरील बेटिंगमुळे (Betting) कंगाल झालेल्या हरियाणा (Haryana) येथील बीटेक इंजिनिअर (BTech Engineer) चोर (thief) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याने पुण्यात विमानाने येऊन ही चोरी केल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्याला हरियाणा येथील घरातून अटक केली. ट्विन्कल अर्जुन अरोरा Twinkle Arjun Arora (वय-30 रा. बलभगड, जि. फरीदाबाद, हरियाणा) असे अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका प्रतिष्ठित व्यक्तीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिल्याची माहिती परिमंडळ 5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी दिली.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde) यांनी सांगितले, 15 मे रोजी फिर्यादी हे क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी सियाज कारमधून (Ciaz car) राजयोग लॉन्स (Rajyog Lawn) येथे गेले होते. त्याठिकाणी कार पार्क करुन ते दरवाजा लॉक न करता क्रिकेट खेळण्यासाठी गेले. दरम्यान गाडीतून सॅमसंग कंपनीचा टॅप, अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) दोन डेबिट कार्ड अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. चोरलेल्या एका डेबीट कार्डद्वारे 1 लाख काढले व दुसऱ्या कार्डद्वारे 2 लाख 99 हजार 200 रुपयांची खरेदी केली. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.(Pune Crime)

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. फिर्यादी यांच्या बँक खात्याच्या डिटेल्स वरून आरोपीने पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे व फिर्यादी एटीएम कार्डवरुन बदरपुर हरियाणा येथे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. आरोपी हा विमानाने गेला असल्याचा संशय पोलिसांना आला. लोहगाव विमानतळावर (Lohegaon Airport) जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीच्या तिकीट बुकींगवरुन त्याचे नाव व पत्ता ट्विन्कल अरोरा असल्याचे व तो मूळचा हरियाणा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

तांत्रिक विश्लेषणात पोलिसांना आरोराचा मोबाईल नंबर मिळाला. यावरुन तपास पथकाचे अधिकारी (Investigation Team Officer) प्रविण काळुखे (Pravin Kalukhe) व अंमलदार यांची टीम हरिणात पाठवण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे पथक आरोपीच्या राहत्या घरी पोहोचले. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक न्यायालयात हजर करुन त्याची प्रवास कोठडी घेतली. त्याला पुण्यात आणण्यात आले.

 

अन् त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तो हिरयाणातील एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होता. मात्र, तो क्रिकेट प्रेमी होता. याच क्रिकेट प्रेमाच्या वेडातून तो आयपीएल सामन्यावर बेटिंग खेळू लागला. यामध्ये लाखो रुपयांचे कर्ज झाले अन् त्याने चोरीचा मार्ग स्विकारला. त्याच्या वडिलांचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले होते. तर त्याची मोठी बहीण पीएचडी करते.

 

आरोपीला अश्रू अनावर

आरोपी झालेल्या कर्जामुळे चोरीच्या मार्गाला लागला. त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याला केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला.
जेव्हा त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar),
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, अंमलदार शामराव लोहमकर, तानाजी सागर,
संतोष जाधव, शिवाजी येवले व राहुल शेलार यांच्या पथकाने केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Betting on IPL cricket match, BTech engineer became a thief Bibvewadi Police Station Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा