×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ...

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत दिले नाहीत, म्हणून एका 32 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी (Pune Crime) पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

 

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (व-32 रा. स्वामी सदन, आंबेगाव बु. पुणे) असे खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल अमराळे, लहु माने, शुभम मोरे यांच्यावर आयपीसी 302, 364, 388, 341, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत संकेत अनभुले यांच्या पत्नी हर्षदा अनभुले यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल तांबे व अभिजीत जाधव यांना या गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत अमराळे (वय-35 रा. बिबवेवाडी) हा आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ कडून हायवेकडे जाणाऱ्या रोडवर थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सात तासांच्या आत अटक केली. आरोपींनी संकेत अनभुले यांचे अपहरण करुन त्यांना कोंडुन ठेवत बेदम मारहाण केली. यामध्ये संकेत यांचा मृत्यू झाला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक,
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसार, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार राहुल तांबे,
अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, रविंद्र भोरडे, राहुल शेडगे, हर्षल शिंदे, मंगेश पवार,
अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड,
मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested the accused who kidnapped and killed a builder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News