Pune Crime | भरधाव BMW ची दुभाजकाला धडक ! दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची अग्निशमन दलाच्या जवानाने केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | भरधाव जाणार्‍या BMW ने पहाटेच्या सुमारास दुभाजकाला धडक दिली. आलिशान गाडीतील सोयीमुळे वेळीच त्यातील Airbag उघडून चालक व त्याच्या शेजारी बसलेल्यांचे प्राण वाचले. मात्र, ही ही धडक इतकी जोरात होती की, या गाडीचे संपूर्ण इंजिन मागे आल्याने त्यात अल्पवयीन चालकाचे पाय अडकले होते. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी गाडीचा पुढचा भाग कापून या मुलाची सुटका केली. या गाडीतील दोन्ही १७ वर्षाच्या मुलांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (deenanath mangeshkar hospital ) उपचारासाठी दाखल (Pune Crime) करण्यात आले आहे.

 

याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक बीएमडब्ल्यु गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने DP Road वरुन म्हात्रे पुलाकडे येत होते.
वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक (Pune Crime) दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, या आलिशान गाडीचे इंजिन मागे सरकले गेले.
एअरबॅगमुळे गाडीतील दोघांचे प्राण वाचले. पण चालक युवकाचे दोन्ही पाय अडकले होते.
अग्निशमन दलाला याची खबर मिळाल्यावर एरंडवणा फायर स्टेशनची गाडी रवाना झाली.
तसेच मुख्य केंद्रातून रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी पोहचली.
अग्निशमन दलाचे अधिकारी जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रेडर व कटरच्या सहाय्याने गाडीच्या इंजिनाने पार्ट कापून काढले.
गाडीचा पुढचा भाग मागे ओढून तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर या अल्पवयीन चालकाची सुटका केली.

 

सुदैवाने मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांना अपरात्री गाडी चालवायला देणार्‍या पालकांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत (Pune Crime) आहे.

 

Web Title : Pune Crime | BMW car hits divider! A minor driver with both legs was rescued by firefighters

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Primary Schools Reopen | राज्य सरकारकडून पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरू करण्याचे संकेत

High Court | खासगी जागेत दारू पिणे गुन्हा नाही – उच्च न्यायालयाचा निर्णय

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?