Pune Crime | भांडणाच्या रागातून नववीत शिकणाऱ्या मुलावर शाळेतील मुलाने केले कोयत्याने वार, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग (Quarrel) मनात धरून दहावीत शिकणाऱ्या मुलाने नववीत शिकणाऱ्या मुलावर शाळेतच कोयत्याने वार (Boy Attacked his Schoolmate) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयात (Bhairavanath Vidyalaya) बुधवारी (दि.28) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

कुणाल विकास कराळे Kunal Vikas Karale (वय-15) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. कुणाल याच्या डोक्यात, हाताला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital, Manchar) उपचार सुरु आहेत. जखमी कुणाल आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मधील वाद मिटवला होता. मात्र, दहावीतील विद्यार्थ्याच्या मनात राग होता. (Pune Crime)

 

दहावीत शिकणाऱ्या मुलाने भांडणाचा राग मनात धरुन बुधवारी कोयता लवपून आणला. कुणाल शाळेच्या मैदानातून जात असताना त्याने पाठिमागून कुणालवर तीन ते चार वार केले. यामध्ये कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. कुणाल याला तातडीने मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे (Manchar Police Station)
पोलीस निरीक्षक सतीश होडगर (Police Inspector Satish Hodgar) यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.
पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे (PSI Shekhar Shete), पोलीस कर्मचारी तुकाराम मोरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | boy attacked his schoolmate in ambegaon manchar pune Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…